Baramti Traffic Police : ३ दिवसांत १०७ वाहनधारकांना दंडाचा झटका; बारामती ट्रॅफिक पोलिसांची धडक मोहीम

 

            पुरंदर रिपोर्टर Live 

बारामती : प्रतिनिधि 

                   

                    बारामती येथिल टीसी कॉलेज परिसरात वाहनचालकांकडून सातत्याने होणाऱ्या वाहतूक नियमांच्याउल्लंघनावर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत तीन दिवसांत तब्बल १०७वाहनांवर कारवाई करत ,०५,५०० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहेही कारवाई १२१३आणि १५ जुलै २०२५ या तीन दिवसांत करण्यात आली.



             वाहनांवर ट्रिपल सीट बसणेअतिवेगाने गाडी चालवणेकाळ्या काचाचुकीच्या किंवा नंबरनसलेल्या प्लेट्स अशा प्रकारांवर ही कारवाई होतीटीसी कॉलेज परिसर हा बारामतीतील महत्त्वाचा विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असलेला भाग असल्याने येथे वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचेपोलिसांचे निरीक्षण आहेयाआधीही या परिसरात अशीच मोहीम राबवण्यात आली होतीआता पुन्हाएकदा तीन दिवसांचे विशेष पथक तयार करून ही कारवाई हाती घेण्यात आलीकारवाई दरम्यान काहीवाहनचालकांनी पोलिसांचा थांबण्याचा इशारा दुर्लक्षित करून वाहन घेऊन पळ काढलात्यामध्ये(एम.एच.४२ बी.१०६२या नंबरची लाल रंगाची स्विफ्ट कार काळ्या काचा आणि लहान अक्षरात नंबरप्लेटसह आढळून आलीचालकाला थांबवूनही तो  थांबता पळ काढल्याने माळेगाव पोलिसांच्यामदतीने ही गाड़ी ताब्यात घेण्यात आली.



              तसेच (एम.एच.४२ बी.एच.६६८९या नंबरची बुलेट गेल्या दीड वर्षांपासून चुकीच्या नंबर प्लेटसहआणि मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरसह फिरत असल्याचे निष्पन्न झालेयावर करण्यात आलेला दंडइंदापूर तालुक्यातील एका टेम्पोवर जमा होत असल्याचे लक्षात आल्याने वाहतूक पोलिसांकडून याचामागोवा घेतला जात होताअखेर ही गाडी ताब्यात घेण्यात आलीया कारवाईत आणखी एका मोठ्याआवाजाच्या सायलेन्सर असलेल्या यमाहा (एम.एच.४२ बीआर१९२५गाडीचाही समावेश होतापोलिसांनी थांबण्यास सांगूनही गाडी  थांबवल्यामुळे पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आलेयाशिवाय (एमएच४२ बीएल७२९४ही स्प्लेंडर प्लस दुचाकी नंबर प्लेटशिवाय फिरताना आढळूनआलीहे सर्व वाहने बारामती वाहतूक शाखेत डिटेन करण्यात आलेली आहेतयासह इतर वाहनांवरकारवाई करण्यात आली.



ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीयपोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीसउपनिरीक्षक सुभाष काळेपोलीस अंमलदार प्रदिप काळेसुधाकर जाधवअजिंक्य कदमरेश्मा काळेसिमा घुलेरूपाली जमदाडेमाया निगडेस्वाती काजळेदत्तात्रय भोसलेआकाश कांबळेप्रज्योजचव्हाण आणि शीघ्र कृती दलाचे १४ जवान यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments